Lokbiradari

लोकबिरादरी ( हेमलकसा )
भामरागड हे ठिकाण गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भाग म्हणून प्रसिध्द आहे. येथे नव्याने तालुक्याची निर्मिती झाली आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 180 कि.मी. तर आलापल्लीपासून 70 कि.मी. अंतरावर भामरागड हे ठिकाण आहे. पामलगौतम, इंद्रावती व पर्लकोटा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर भामरागड वसले आहे. घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त परिसर असून सृष्टी सौंदर्याने ते नटलेले आहे. त्रिवेणी संगमावर सुर्योदय व सुर्यास्त पाहण्याचा वेगळा आनंद येथे उपभोगायला मिळते.

पर्लकोटा व पामलगौतम नद्यांच्या काठावर दोन विश्रामगृह असून एक वनखात्याचे तर दुसरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे. पर्यटनसाठी आलेल्यांना राहण्यासाठी उत्तम सोयींनी युक्त असे हे विश्रामगृह आहे. येथून भामरागडच्या नैसर्गिक सौंदर्यांचा आनंद देखील लुटता येतो.

हेमलकसा येथे लोकबिरादरी नावाचे प्रकल्प असून भामरागडपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मेगॅसेस पुरस्कार प्राप्त बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांचा प्रकल्प असणारा लोकबिरादरीचा रोग्यांचा दवाखाना आहे. बाबाचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे आणि सौ. डॉ. मंदाताई आमटे हे दाम्पत्य लोकसेवेचे व्रत घेऊन येथे आदिवासी बांधवाची आरोग्य सेवा करीत आहेत. सर्व आरोग्य सोयींनी सुसज्ज दवाखाना आहे. येोि शस्त्रक्रिया, गंभीर रोगावर उपचार केला जातो. दवाखान्याला लागूनच आदिवासी मुलांसाठी इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे तसेच राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था आहे.

आदिवासी माडियांच्या मुलांना शिक्षणाबरोबर शेती, शिक्षण, हस्तकला, बांबूपासून व लाकडापासून वस्तू बनविण्याचे व स्वावलंबनाचे शिक्षण दिले जाते. त्या परिसरातील जंगलात असलेल्या हिस्त्र प्राण्यांची माहिती आदिवासींना व्हावी. त्यांच्यात प्राण्याबद्यल आपुलीकीची भावना निर्माण करण्याच्या हेतुने प्राणी संग्रहालय आहे. येथे वाघ, बिबटया, अस्वली, तरस, रानडुक्कर, हरीण, माकड, विषारी नाग, मन्यार तसेच अजगर, सुसरी व पक्षी पाहण्यास वेगळा आनंद मिळतो.

या निसर्गाने नटलेल्या परिसरात माडिया जमात मोठया आनंदाने व गुण्यागोविंदाने राहत आहे. याची परंपरा वैशिष्टयपूर्ण असून कला व संस्कृती आजपर्यंत त्यांनी जपून ठेवली आहे. त्यांची लोकगीते व नृत्य अध्ययनाचा विषय बनलेले आहे. सणासुदीला, लग्नप्रसंगी व आनंदाच्या वेळी त्यांच्यातील पारंपारीक 'रेला नृत्य' आणि 'ढोल' याला विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment