About



भौगोलिक वैशिष्टे

            जिल्हयानी अनेक भौगोलीक वैशिष्ट्यै असून वैनगंगेचे खोरे हे या वैशिष्टयापैकी एक आहे. हे खोरे साधारण गडचिरोली जिल्हयाच्या पश्चिमेस असून त्यामध्ये गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा या तहसिलींचा भाग समाविष्ट होतो. जिल्हयातील धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तहसिलीचा भाग उंचवटयाचा असून या भागात घनदाट जंगले आहेत. याच भागात अहेरी, भामरागड, टिप्पागड, पळसगड व सुरजागड या प्रमुख टेकडया आहेत. जिल्हयातील सर्वांत उंच शिखर गडलगट्टा पहाडामध्ये 967 मिटर आहे. येथील टेकडयातील रांगाना निरनिराळे नांवे असून त्यापैकी टिप्पागड रांगा, सिरोंचा रांगा व इंद्रावती जवळील सुरजागड रांगा या आहेत. टिप्पागड रांगेची समुद्रसपाटी पासूनची उंची 609 मिटर असून सिरोंचा रांगाची उंची 548 मिटर इतकी आहे.
                                               
 

गडचिरोली जिल्हयाची लोकसंख्या

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १०७२९४२ असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५४१३२८, ५३१६१४ याप्रमाणे आहे ( २०११ च्या जनगणने नुसार). जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती ची लोकसंख्या अनुक्रमे १२०७४५ व ४१५३०६ ऐवढी आहे. जिल्ह्याची एकूण साक्षरता ६६.०३ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्येची टक्केवारी ११.२५ % व ३८.१७ % अनुक्रमे आहे.

                        
जलसिंचनाची साधने

        
जलसिंचन करणाऱ्या विविध प्रकारच्या साधनांना भिनविले जाणाऱ्या क्षेत्राचा विचार केला असता जिल्हयामध्ये नैसर्गिक पावसाची उपलब्धता बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे विहिरीच्या पाण्यावर होणारे ओलीताचे प्रमाण तलाव, कालवे व बोडया इत्यादी साधनांनी होणारा ओलीताच्या प्रमाणापेक्षा नेहमी बरेच कमी राहत आले आहे. ओलीताखालील निव्वळ क्षेत्र 54944 हेक्टर असून त्यापैकी 51619 हेक्टर तलाव, कालवे व बोडया इत्यादी साधनांनी ओलीत केले जाते तर 32.95 हेक्टर क्षेत्र विहीरीच्या पाण्याखाली साधारणत: भिजविल्या जाते. ओलीताखालील एकुण क्षेत्र 58344 हेक्टर एवढे आहे. जिल्हयात 1968 जिल्हा परिषदेचे व 21 राज्य शासनाचे असे एकूण 1989 तलाव आहे. मागील वर्षी सिंचन विहीरी 4744 होत्या. या जिल्हयात एकही मोठा प्रकल्प नाही. रेगडी येथील दिना हे एकमेव मध्यम प्रकल्प आहे.


या जिल्हयातील भात हे मुख्य पिक असल्यामुळे ओलीताखालील असणाऱ्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र म्हणजे 93.32 या पिकाखाली आहे. त्यानंतर उरलेल्या क्षेत्रात मिरची, रब्बी, ज्वारी, तिळ, भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या 2004 कामांमुळे 1531 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले आहे.

No comments:

Post a Comment